अशोक सराफ यांनाही झाली 'ग'ची बाधा? लक्ष्मीकांत यांच्याबद्दल बोलताना म्हणाले- त्याने नेहमी माझ्या ड्रायव्हर, भावाची भूमिका ...

Ashok Saraf And Laxmikant Berde Relationship: आपापल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या करिअरमध्ये विनोदी भूमिकांशिवाय काहीच केलं नाही असं अशोक सराफ म्हणालेत.
ashok saraf

ashok saraf

esakal

Updated on

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. विनोदी भूमिका असो किंवा गंभीर अशोक सराफ यांनी आपल्या हटके स्टाइलने त्या भूमिका साकारल्या. मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या तोडीस तोड एक अभिनेता होता तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत यांनीही आपल्या कारकिर्दीत अनेक विनोदी भूमिका साकारल्या. तसेच ते काही गंभीर भूमिकांमध्येही दिसले. 'एक होता विदूषक' यातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. असं असूनही अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत लक्ष्मीकांत यांनी त्यांना फॉलो केलं असं म्हटलंय. सोबतच लक्ष्याने विनोदी भूमिका सोडून इतर काही केलं नाही असं ते म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com