
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र आता या कार्यक्रमात अभिनेता निलेश साबळेच्या ऐवजी अभिनेता अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या नवीन पर्वात बरेच बदल आपल्याला पाहायला मिळती. आज अभिजीतचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्री श्रेया बुगडे हिनेदेखील एक पोस्ट करत अभिजीतच्या नव्या भूमिकेसाठी त्याला शुभेच्छा दिल्यात.