
Entertainment News : झी 5 वरील नवीन ओरिजिनल वेबसीरिज ‘छल कपट: द डिसेप्शन’ मध्ये अभिनेत्री श्रिया पिळगावकर पहिल्यांदाच पोलिसाची भूमिका साकारत आहे.
'गिल्टी माइंड्स'मधील वकील, 'द ब्रोकन न्यूज'मधील पत्रकार, 'ताजा खबर'मधील सेक्स वर्कर आणि 'क्रॅकडाऊन'मधील डबल एजंट अशा विविध व्यक्तिरेखा साकारल्यानंतर आता श्रिया ‘इन्स्पेक्टर देविका राठोड’ म्हणून एक नवा आविष्कार घेऊन आली आहे.