
SHRIYA PILGAONKAR
ESAKAL
लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. अनेक चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलंय. त्यांची लेक श्रिया पिळगावकर हिनेदेखील आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. श्रियाने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. अनेक वेबसीरिजमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रियाने तिच्या वडिलांच्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं आहे.