
shruti marathe
esakal
अभिनेत्री श्रुती मराठे हिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तिने बालकलाकार म्हणूनही काम केलंय. तिने तिच्या करिअरची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटातून केली. तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपट केले. मात्र पुढे तिला ते अवघड वाटू लागल्याने ती मराठी सिनेसृष्टीकडे वळली. मात्र या सगळ्यातून तिला जेवढी लोकप्रियता मिळाली नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त लोकप्रियता तिला एका मालिकेने मिळवून दिली. ती मालिका म्हणजे 'राधा ही बावरी'. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. मात्र जेव्हा ती लोकप्रिय ठरली तेव्हाच तिचा एक बिकिनी सीन सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आणि त्यावरून ती प्रचंड ट्रोल झाली. त्याबद्दल श्रुतीने उत्तर देत सगळ्यांची बोलती बंद केलेली.