

shubh shravani serial time and date
esakal
छोट्या पडद्यावर लवकरच काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात काही स्टार प्रवाहवरील मालिका आहेत तर काही झी मराठीवरील. झी मराठीवर लवकरच 'शुभ श्रावणी' ही मालिका सुरू होतेय. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता/ मात्र या मालिकेच्या प्रदर्शनाची वेळ आणि तारीख दाखवण्यात आली नव्हती. मात्र आता या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या प्रोमोमध्ये मालिकेची वेळ आणि तारीख सांगितली आहे. मात्र त्यामुळे प्रेक्षकांची आवडती मालिका निरोप घेणार का असा प्रश्न सगळ्यांना पडलाय.