
शुभांगी गोखले यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मराठीसोबतच हिंदीमध्येही स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलंय. त्यांनी अभिनेते आणि पती मोहन गोखले यांच्या मृत्यूनंतर एकटीने मुलीचा सांभाळ करत पुन्हा सिनेसृष्टीत पदार्पण केलं. शुभांगी त्यांच्या परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्या नवनवीन भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. मात्र अभिनय क्षेत्रात आल्यानंतर त्या मोहन यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होत्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं आहे.