
'कसौटी जिंदगी की' मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने २००० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तिने आता वयाची पन्नाशी गाठली असली तरी तिचा फिटनेस तिशीतल्या तरुणींना लाजवणारा आहे. मात्र श्वेता जितकी तिच्या अभिनयामुळे चर्चेत राहिली. तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. तिने दोन लग्न केली मात्र ती दोन्ही लग्न मोडली. तिचा दुसरा पती अभिनव कोहली याने अभिनेत्रीवर गंभीर आरोप केले होते.