

siddharth chandekar
esakal
मराठी सिनेसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या सिद्धार्थ चांदेकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सहजसुंदर अभिनय, भूमिकांतील प्रामाणिकपणा आणि सतत स्वतःला नव्याने सादर करण्याची जिद्द यामुळे सिद्धार्थ आज मराठीतील महत्त्वाचा अभिनेता ठरला आहे. ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ यांसारख्या चित्रपटांतून त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडलीच, परंतु प्रत्येक वेळी तो वेगळा आणि परिपक्व अभिनेता म्हणून समोर आला.