Navra Maza Navsacha 2: अब मजा आयेगा ना भिडू! 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये सिद्धार्थ जाधवची एंट्री; वाचा चित्रपट कधी येणार?

Siddharth Jadhav In Navra Maza Navsacha 2: प्रेक्षक 'नवरा माझा नवसाचा २'ची आतुरतेने वाट पाहत आहेत.
siddharth jadhav in Navra Maza Navsacha 2
siddharth jadhav in Navra Maza Navsacha 2sakal

Siddharth Jadhav: लोकप्रिय मराठी अभिनेते सचिन पिळगावकर अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांचा 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट आजही घराघरात आवडीने पाहिला जातो. मराठी सिनेसृष्टीतील कळतं चित्रपटांमध्ये त्याची गणना होते. आता तब्बल १९ वर्षांनंतर सचिन यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली. त्यानंतर चाहत्यांमध्ये एकच जल्लोष करण्यात आला. चाहते आता 'नवरा माझा नवसाचा २' पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सचिन यांनी या चित्रपटातील कलाकारांबद्दलही सांगितलं होतं. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अशातच आता आणखी एका अभिनेत्याची या चित्रपटात एंट्री झाली आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव या चित्रपटात झळकणार आहे.

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारा आपला सिद्धू या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थने सोशल मीडियावर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाच्या पोस्टरसोबत आणि सचिन यांच्यासोबतचे फोटो त्याने शेअर केले आहेत. सिद्धार्थने या चित्रपटाचं डबिंग पूर्ण केलं आहे. तो या चित्रपटात नेमकी काय भूमिका साकारणार हे समजलं नसलं तरी त्याच्या असण्याने चित्रपटात एक वेगळी गंमत पाहायला मिळणार हे मात्र नक्की. त्याच्या पोस्टवर चाहते त्याचं अभिनंदन करत आहेत. सोबतच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याचीही विचारणा करत आहेत.

यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी याबद्दल माहिती दिली होती. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून आता डबिंग सुरू आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो असं सचिन यांनी सांगितलं होतं. आता चाहतेय चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

siddharth jadhav in Navra Maza Navsacha 2
Kakuda Trailer: रागीट भुताला वेसण घालणार कोण? रितेश-सोनाक्षीच्या 'ककुदा'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; फक्त ५ दिवस बाकी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com