

krantijyoti vidyalay movie review
esakal
“माझी माय सरसोती, माले शिकवते बोली,
लेक बहिनाच्या मनी, किती गुपितं पेरली…” ही कविता प्रत्येक मराठी माणसाच्या शालेय आठवणींमध्ये कुठे ना कुठे रुजलेली आहे. या ओळींतून कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी मातृभाषेमधलं शिक्षण आणि तिच्यातून घडणारे संस्कार यांचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. आज भाषा फक्त संवादाचं साधन राहिलेलं नाही तर भाषा आपल्याला घडवते, लोकांना एकमेकांशी जोडते आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मातृभाषेमुळेच आपली संस्कृती जपली जाते. मात्र आज जागतिकीकरणाच्या रेट्यात इंग्रजी माध्यमाकडे झुकणारा समाज नव्या भाषा आत्मसात करत असताना, आपली मातृभाषा हळूहळू मागे पडत चाललेली आहे.