
पैसे कमी असतात, पण माणसांची श्रीमंती अपार असते. मनात थकवा असतो, पण चेहऱ्यावर हसू झळकतं. स्वप्नं थोडी मागे असतात…पण घरासाठी चालणं, थांबणं, लढणं — हेच आयुष्य वाटतं. असाच एक आहे मारुती जाधव. ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटात सिद्धार्थ जाधव साकारतोय ‘मारुती’ ..एक प्रेमळ कुटुंबातला साधा, शांत, आणि खंबीर माणूस. स्वतः पेक्षा जास्त बायको, मुलगी आणि वडिलांच्या चेहऱ्यावर हसू राहावं म्हणून सतत प्रयत्न करणारा तुमच्या आमच्यातलाच एक. मारुतीकडे एक दिवस एक अनपेक्षित संधी येते आणि मुलीच भविष्य आणि शिक्षणाबरोबरच स्वतःच आयुष्य सुधारवण्याची आणि अभिमानाने जगण्याची संधी. ती स्वीकारायची की दुर्लक्ष करायचं, हा निर्णय ‘मारुती’चा …असा बाप जो मुलांच्या आनंदासाठी वाटेल ते करू शकतो.