
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते दोघे प्रेमात पडले होते. आता सिद्धार्थ आणि कियारा लवकरच आईबाबा होणार आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच ही गुडन्यूज चात्यांना दिली होती. तेव्हापासून सिद्धार्थ प्रत्येक ठिकाणी कियाराची काळजी घेताना दिसतो. तो प्रत्येक ठिकाणी तिच्यासोबत सावलीप्रमाणे असतो.मात्र त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय ज्यात तो पापाराझींवर चांगलाच भडकलेला दिसतोय.