
वर्ष २०२२, तारीख २९ मे, वेळ संध्याकाळी ५:३० वाजता, मानसा येथील जवाहरके गावातील रस्ते सततच्या गोळीबाराच्या आवाजाने दणाणले होते. त्यादिवशी पंजाबी संगीत क्षेत्राला दिवसाढवळ्या मोठा धक्का बसला, ज्याची भरपाई करणे अशक्य आहे. गायक सिद्धू मूसेवालाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी तेव्हा लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळीने घेतली होती. पण आज या वेदनादायक घटनेला तीन वर्षे उलटून गेली आहेत, तेव्हा कुटुंबाच्या आणि लाखो चाहत्यांच्या मनात शेकडो प्रश्न आहेत. प्रश्न असा आहे की बिश्नोई-ब्रार टोळीने सिद्धू मूसेवालाची खरोखरच हत्या केली का? या हत्येचे कारण काय होतं? २८ वर्षीय सिद्धूने कोणाचं काय नुकसान केलेलं?