Sidhu Moose Wala: सिद्धू अन् वडिलांसह 'टाइम्स स्क्वेअर'मध्ये झळकला ज्युनिअर मूसेवाला, पाहा व्हिडिओ

Sidhu Moose Wala Brother: 29 जून 2022 रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील मूसा या गावाजवळ सिद्धू मुसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
Sidhu Moose Wala On Times Square
Sidhu Moose Wala On Times SquareEsakal

Sidhu Moose Wala On Times Square:

दिवंगत पंजाबी रॅपर सिद्धू मुसेवालाचे पालक बलकौर सिंग आणि चरण कौर हे पुन्हा एकदा आई-बाबा झाले आहेत. सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर यांनी नुकताच बाळाला जन्म दिला आहे. त्यांनी या बाळाचे नाव शुभदीप असे ठेवले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमधील बिलबोर्डवर सिद्धू मुसेवाला त्याचे वडिल आणि नवजात बाळ झळकल्याचे पाहायला मिळत आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 'लुधियाना लाईव्ह' या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, 'सिद्धू मुसेवालासाठी हा मोठा क्षण आहे. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये त्याचे वडील आणि भावासह तो झळकत आहे.'

टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर सिद्धू मुसेवालाचा 1993 मध्ये तो जन्मला तेव्हाचा आणि आता 2024 मध्ये जन्मलेल्या शुभदीपचा फोटो दाखवण्यात आला आहे. यावेळी व्हिडिओमध्ये मुसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी शुभदीपला आपल्या मांडीवर धरल्याचे दाखवण्यात येत आहे. दुसऱ्या एका चित्रात मुसेवाला आणि त्यांच्या वडिलांचा फोटो आहे.

दरम्यान याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सिद्धूच्या निधनानंतर दोन वर्षांनी बलकौर आणि चरण यांनी नुकताच एका मुलाला जन्म दिला. गेल्या आठवड्याच्या, बलकौर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत त्यांना मुलगा झाल्याची घोषणा केली.

यावेळी आपल्या नवजात मुलाच्या जन्माची घोषणा करताना सिद्धूच्या वडिलांनी, ‘लिजेंड्स नेव्हर डाय’ असे लिहिले होते. यावेळी बलकौर यांच्या मांडीवर त्यांचे बाळ होते. तर शेजारी सिद्धू मुसेवालाचा फोटो होता.

Sidhu Moose Wala On Times Square
Urvashi Rautela: "माझं मत तुलात," लोकसभेसाठी तिकिट मिळाल्याचा उर्वशीचा दावा, सोशल मीडियावर मात्र कमेंट्सचीच हवा
Sidhu Moose Wala On Times Square
Dil Chahta Hai Sequel: 'दिल चाहता है'चा सिक्वेल येणार का? फरहान अख्तरने एका वाक्यात संपवला विषय

29 जून 2022 रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील मूसा या गावाजवळ सिद्धू मुसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

यानंतर काही वेळातच, गोल्डी ब्रारने एका फेसबुक पोस्ट करत याची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गोल्ड ब्रारवर या हत्येमागील सूत्रधार म्हणून गुन्हा नोंदवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com