Abdu Rozik : अब्दुने गुपचूप उरकला साखरपुडा ; फॅन्सनी केला शुभेच्छांचा वर्षाव

Abdu Rozik Engagement - गायक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अब्दु रोझिकने त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. नेटकऱ्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
Abdu Rozik : अब्दुने गुपचूप उरकला साखरपुडा ; फॅन्सनी केला शुभेच्छांचा वर्षाव

Abdu Rozik : बिग बॉस फेम अब्दु रोझीकच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अब्दुने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तो लग्न करणार असल्याची बातमी शेअर केली आणि नुकताच एका खाजगी समारंभात त्याचा साखरपुडा पार पडला. सोशल मीडियावर त्याने त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

अब्दुने शेअर केलेल्या फोटोमध्ये अरेबियन पोशाखात दिसत असून त्याची होणारी पत्नी अमिराने पांढऱ्या रंगाचा बुरखा घातला आहे. अब्दुने तिचा चेहरा रिव्हील केला नाहीये व तो फोटोमध्ये तिच्या हातात हिऱ्याची अंगठी घालताना दिसतोय. 24 एप्रिलला त्याने अमिराशी साखरपुडा केल्याचं उघड केलं.

पहा फोटो:

अब्दुने हे फोटो शेअर करताच त्याच्यावर सगळ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. त्याचे सेलिब्रेटी मित्र आणि चाहते त्याच्या साखरपुड्यासाठी खुश आहेत. 7 जूनला अब्दु आणि अमिराचं लग्न पार पडणार आहे. त्याचं लग्न भारतात होणार की दुबईत आणि त्याची मित्र-मंडळी या लग्नाला उपस्थित राहणार का हे अजून त्याने रिव्हील केलं नाहीये.

ई- टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये अब्दु म्हणाला की, " प्रेमाशिवाय मौल्यवान काहीच नसतं अस मला वाटतं. मी माझ्या आयुष्याच्या या नव्या प्रवासाला सुरू करण्यास उत्सुक आहे. माझ्यासाठी माझं दैनंदिन जीवन जगणं खूप कठीण आहे. आणि त्यात स्वतःसाठी प्रेम शोधणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं पण देवाच्या कृपेने मला आमिरा मिळाली आणि मी जसा आहे तसाच तिला पसंत आहे. तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे."

मूळच्या तजाकिस्तानच्या असलेल्या अब्दुने त्याच्या गाण्यामुळे जगभर ओळख मिळवली आहे. बिग बॉस सीजन 16 मुळे तो घराघरात पोहोचला. 2023 या वर्षात अब्दुने अनेक प्रोजेक्टसमध्ये काम केलं होतं. 'बिग बॉस ओटीटी सीजन 2' मध्ये तो सहभागी झाला होता. तर झी टीव्हीवरील 'प्यार का दुसरा नाम राधा मोहन' या मालिकेतही त्याने काम केलं होतं. याशिवाय त्याचा बर्गरचाही बिझनेस आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com