
अश्विनी देशकर : सकाळ वृत्तसेवा
नागपूर : मुंबईसारख्या कलाकारांच्या महासागरात नागपूरसारख्या छोट्या शहरातून येऊन संगीत क्षेत्रात नाव कमाविणे सोपे नव्हते. पण या स्वप्नाला वास्तवात उतरवायची हिंमत मिळाली, ती माझ्या बाबांमुळे. बाबा रमेश गिर्हे म्हणजे समर्पण, शिस्त, आणि कणखर इच्छाशक्ती यांचे मूर्तरुप असून त्यांचा माझ्यावरचा विश्वासच माझे बळ ठरला.