Viral Video : गायक अंकित तिवारीच्या कृतीचं होतंय कौतुक, गाणं थांबवत बेशुद्ध कॅमेरामनला पाजलं पाणी

Ankit Tiwari : गायक अंकित तिवारीने चालू कॉन्सर्टमधील त्याचं गाणं थांबवत बेशुद्ध पडलेल्या कॅमेरामनला मदत केली.
Ankit Tiwari concert
Ankit Tiwari concertEsakal

Ankit Tiwari helps cameraman : बॉलिवूडमधील आघाडीच्या गायकांपैकी एक असलेल्या गायक अंकित तिवारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अंकितचं एका ठिकाणी कॉन्सर्ट सुरु होतं. त्याचा कार्यक्रम सुरु असतानाच त्याचा कॅमेरामनला चक्कर आली. त्यावेळी अंकितने केलेल्या कृतीची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Ankit Tiwari concert
Noor Malabika: अभिनेत्रीच्या मृत्यूप्रकरणी कलाकारांच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र; केली चौकशीची मागणी

अंकितच्या कृतीचं होतंय कौतु

बॉलिवूडमधील आघाडीचा गायक असलेल्या अंकित तिवारीच्या एका ठिकाणी लाईव्ह कॉन्सर्ट सुरु होता. हा कॉन्सर्ट शूट करणाऱ्या काही कॅमेरामनपैकी एक कॅमेरामनला अचानक चक्कर आली. अंकितचं त्याच्याकडे लक्ष जाताच त्याने स्वतःचं गाणं थांबवलं आणि तो कॅमेरामनकडे धावत गेला आणि त्याला पाणी दिलं. सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी त्याच्या या कृतीचं कौतुक केलं.

सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट्स करत अंकितच्या कृतीच कौतुक केलं. "अजूनही माणुसकी जिवंत आहे, अंकितला सलाम ",'अंकित खरंच एक हिरा आहे' अशा कमेंट्स अनेकांनी या पोस्टवर केल्या आहेत. तर अनेकांनी इमोजी शेअर करत त्यातुन त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

अंकितची कारकीर्द

मूळच्या कानपूरच्या असलेल्या अंकितने लहानपणीच संगीताचं शिक्षण घेतलं आहे. त्याचे आई-वडीलही गायक आहेत. त्याची आई भजनांसाठी कानपूरमध्ये प्रसिद्ध होती. त्याने काही काळ ग्वालियरमधील एका रेडिओ कंपनीत स्टेशन हेड म्हणून काम केलं. त्यानंतर त्याने संगीतक्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबई गाठली. त्याने अनेक रिअलिटी शोमध्ये सहभाग घेतला आणि स्वतःची ओळख निर्माण केली.

त्याने पहिलं व्यावसायिक गाणं गायलं ते २०१० मध्ये. दो दुनी चार या सिनेमात त्याने बाजा भैय्या हे गाणं त्याने गायलं पण त्याला 'सून राहा है ना तू',''तेरी गलियां' या गाण्यांमुळे प्रसिद्धी मिळाली. याबरोबरच त्याने अनेक गाण्यांना संगीतबद्धही केलं आहे.

'बाटला हाऊस', 'सडक २', 'एक व्हिलन रिटर्न्स', 'फ्राय डे' या सिनेमांसाठी त्याने संगीतकार म्हणून काम केलं आहे.

अंकितने २०१८ मध्ये पल्लवी शुक्लाशी लग्नगाठ बांधली आणि त्यांना एक मुलगी आहे.

Ankit Tiwari concert
Kalki 2898 AD Trailer: सुरु झालंय नवं युद्ध... प्रभासच्या कल्की 2898 एडीचा ट्रेलर रिलीज, काय आहे खास?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com