नवी दिल्ली: गायक कुमार सानू यांनी व्यक्तिमत्त्व आणि नावाचा गैरवापर रोखण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायाधीश मनीत प्रीतम सिंग अरोरा यांच्या न्यायालयात १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे..कुमार सानू यांनी याचिकेत, व्यक्तिमत्त्व आणि नावाचा गैरवापर करण्यापासून संरक्षण मागितले आहे. यात आवाज, गायनशैली, तंत्र, सादरीकरण पद्धत, छायाचित्रे, कार्टून, प्रतिमा आणि स्वाक्षरीचा समावेश आहे. त्यांच्या नावाचा, आवाजाचा किंवा छायाचित्रांचा बेकायदापणे व्यावसायिक वापर होत असल्यामुळे जनतेत गोंधळ आणि फसवणूक निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे त्यावर न्यायालयाने बंदी घालावी, अशी मागणी केली..Electricity Employees Strike: वीज ग्राहकांना मोठा दिलासा! वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे.ॲड. शिखा सचदेवा आणि सना रईस खान यांच्यामार्फत दाखल केलेल्या या याचिकेत कॉपीराइट कायद्याच्या तरतुदीनुसार सानू यांच्या कलाकृतींवरील नैतिक हक्कांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचिकेत म्हटले आहे की, काही पक्ष सानू यांचं नाव, आवाज आणि व्यक्तिमत्त्व वापरून कायद्याचे उल्लंघन करत आहेत. सानू यांच्या दाव्यानुसार विविध जीआयएफ तसेच आवाज आणि सादरीकरणाचे ऑडिओ आणि व्हिडिओ हे परवानगी न घेता सोशल मीडियावर व्हायरल केले जात असून एकप्रकारे त्यांची प्रतिष्ठा मलिन करत आहेत. .India Post Recruitment 2025: पदवीधरांनो, आनंदाची बातमी! इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 पदांची भरती जाहीर, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख .काहीजण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आवाजाची, गायनशैलीची आणि चेहऱ्याची नक्कल करत आहेत तसेच त्यावर आधारित बनावट उत्पादने तयार करून व्यावसायिक फायदाही घेत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.