
भारतीय सिनेविश्वातील आघाडीची गायिका मोनाली ठाकूर हिच्या आईचं काल 18 मे 2024 ला निधन झालं. मोनालीच्या आईचं नाव मिनाती ठाकूर होतं आणि त्या गेले काही दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या. त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं पण त्या उपचाराला प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांची लाईफ सपोर्ट सिस्टम काढून टाकण्यात आली. मोनालीची बहिणी मेहूलीने आईच्या मृत्यूची बातमी जाहीर केली.
कोव्हीड दरम्यान मोनालीच्या वडिलांचं निधन झालं होतं. तीन वर्षांपूर्वी मोनालीने तिच्या वडिलांना गमावलं होतं आणि आता आईच्या निधनामुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मोनालीची आई या किडनीसंबंधी विकाराने ग्रस्त होत्या आणि त्यांच्यावर डायलिसिस सुरु होता. गेले 22 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होत्या.
मृत्यूसमयी मोनाली आईच्या जवळ नव्हती. बांगलादेशमध्ये मोनालीचा कार्यक्रम होता. आईची तब्येत खराब असतानाही आधीच ठरलेल्या करारामुळे तिला ठरलेला कार्यक्रम रद्द करता आला नाही. त्यामुळे आईच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतरही मोनाली भारतात परतु शकली नाही.
सोशल मीडियावर मोनालीने आईसोबतचे फोटो शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली,"17th मे 2024 2:10 वाजता… आईने अखेरचा श्वास घेतला.. जिने मला उडण्यासाठी पंख दिले अखेर तिचं या जगातून निघून गेली.. माझी आई.. 🌸..
मला माहितीये तुला घ्यायला बाबा आणि दाईची आले असतील..जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी नक्की तुझ्याजवळ येईन पण तोपर्यंत.. आई.. मला माझ्या आईचा खूप अभिमान वाटतो आणि मी भाग्यवान आहे कि मी तुझ्या पोटी जन्म घेतला, मला तुझ्यासारख्या पवित्र व्यक्तीकडून प्रेम, आधार, दृष्टिकोण आणि बुद्धी मिळाली.. तू एक खूप सुंदर आणि बुद्धिमान आई होतीस.. मला हे आयुष्य देण्यासाठी आणि माझ्या आयुष्याचा भाग होण्यासाठी तुझे आभार.. ❤️❤️ माझं सर्वस्व.. माझा आधारस्तंभ..आई तू कायमच माझी प्रेरणा म्हणून राहशील.. या दुःखातून मी कशी सावरेन मला माहित नाही.. हे दुःख कधीही न संपणार आहे.. पुन्हा कधीही स्वतःला त्रास करून घेऊ नकोस..बाय"
मोनालीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्या आईला श्रद्धांजली वाहिली आणि मोनालीचं सांत्वन केलं.