Inspiring Story: शाळेत नाकारलेला आवाज कसा बनला देशाची ओळख! जाणून घ्या पद्मभूषण उषा उथ्थप यांचा प्रेरणादायी प्रवास

Usha Uthup turns rejection into musical success: जड आवाजामुळे शाळेत नाकारण्यात आल्यानंतरही उषा उथ्थप यांनी गायनाची साथ सोडली नाही. हा आवाज त्यांची पुढे ओळख बनला आणि त्याच आवाजाने त्यांना लोकप्रियता, फिल्मफेअर, पद्मश्री आणि पद्मभूषण मिळवूनही दिले.
Usha Uthup

Usha Uthup turns rejection into musical success

esakal

Updated on: 

Mumbai: जड आवाजामुळे ज्या मुलीला शाळेत असताना संगीताच्या वर्गातून बाहेर काढले, ती मुलगी पुढे जाऊन भारतातील लोकप्रिय गायिका बनली! लहान असल्यापासून ज्यांना आपल्या आवाजामुळे हिणवले गेले त्याच आवाजाच्या बळावर पुढे उषा उथ्थप यांनी काळ गाजवला. तोच वेगळा आवाज नंतर त्यांची ओळख बनवली. ज्या आवाजाची शाळेत खिल्ली उडवली गेली, त्याच आवाजाने उषा उथ्थप यांना संगीत क्षेत्रात मोठे यश मिळवून दिले. एवढेच नाही तर २०२४ मध्ये या गुणी गायिकेला पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

Loading content, please wait...