
'पप्पी दे पारूला' मधून घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावलं. असं क्वचितच कुणी सापडेल ज्याने तिचं 'पप्पी दे पारूला' हे गाणं पाहिलं नसेल. या गाण्यात ती चक्क बिकिनीवर दिसली होती. आणि तेव्हा बिकिनीवर मोठ्या पडद्यावर दिसणं तेही मराठी अभिनेत्रीसाठी ही खूप मोठी गोष्ट होती. या गाण्याच्या शुटिंगनंतर ती खूप घाबरली होती. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्मिताने याबद्दल सांगितलं आहे.