

smita jaykar on SALMAN KHAN AND AISHWARYA RAI
esakal
ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात मुख्य अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातदेखील त्या ऐश्वर्या रायच्या आईच्या भूमिकेत दिसल्या. या चित्रपटात ऐश्वर्या आणि सलमान खान होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते प्रेमात पडलेले. आता स्मिता जयकर यांनी या चित्रपटातील 'आँखो की गुस्ताखीयां' या गाण्याची आठवण सांगितली आहे. जेव्हा गरज नसताना सलमानने ऐश्वर्याचा हात पकडलेला.