
सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता सोहेल खान त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला. २०२२ साली त्याने त्याची पत्नी प्रिया सजदेहपासून घटस्फोट घेतला. लग्नाच्या तब्बल २४ वर्षानंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. त्यांनी घटस्फोटाचं कारण स्पष्ट केलं नव्हतं. त्यामुळे वेगवेगळे अंदाज लावले जात होते. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोहेलने पहिल्यांदाच त्याच्या घटस्फोटावर भाष्य केलंय. त्याचं आणि सीमाचं नातं आता कसं आहे याबद्दल त्याने सांगितलंय.