

soham bandekar pooja birari
esakal
लोकप्रिय मराठी अभिनेता आणि निर्माता सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांनी काही महिन्यांपूर्वीच लग्नगाठ बांधली. लोणावळ्यात त्यांचं लग्न पार पडलं. तर मुंबईत त्यांचं रिसेप्शन मोठ्या थाटामाटात करण्यात आलं. अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र त्यांच्या लग्नात चर्चा रंगली होती ती सोहम आणि पूजा वेगळे राहणार का याची. सोहमची आई आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी एका मुलाखतीत मी माझ्या मुलाला आणि सुनेला वेगळा संसार थाटायला सांगणार आहे असं म्हटलं होतं. आणि त्यांची ती गोष्ट खरी देखील ठरली. लग्नानंतर काही दिवसातच पूजा आणि सोहम वेगळे राहू लागले. मात्र आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपण आईमुळे वेगळे राहत नसल्याचा खुलासा सोहमने केलाय.