
एखादा चित्रपट यशस्वी झाला की त्याचा सिक्वेल काढण्याचा ट्रेण्ड हा मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीला काही नवीन नाही. सध्याच्या घडीला हा ट्रेण्ड जोरात सुरू आहे. कित्येक चित्रपटांचा दुसरा आणि तिसरा किंवा चौथा भाग आलेला आहे. कारण सध्या निर्माते व दिग्दर्शक मंडळी कोणताही धोका पत्करायला तयार नाहीत. त्यामुळे ते एखाद्या यशस्वी चित्रपटाची मालिका पुढे चालवीत आहेत. आता लवकरच ‘वाॅर २’ , ‘दृश्यम ३’ या चित्रपटांबरोबरच ‘धमाल ४’ आणि ‘गोलमाल ५’ या चित्रपटांचेदेखील सिक्वेल येत आहेत. आता २०१२ मध्ये आलेल्या सन आॅफ सरदार या चित्रपटाचा सिक्वेल अर्थात ‘सन आॅफ सरदार २’ प्रदर्शित झाला आहे.