

sonalee kulkarni
esakal
मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीला मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हटलं जातं. तिचा गौर वर्ण आणि घरे डोळे यामुळे चाहते तिच्यावर फिदा आहेत. तिने करोना काळात कुणाल बेनोडेकर याच्याशी लग्न केलं. ती कायमच तिचे आणि नवऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता एका मुलाखतीत सोनालीने त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं आहे.