

१९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम साथ साथ हैं' या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या चित्रपटाने एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व प्रेक्षकांना समजावलं होतं. सुरज बडजात्या यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. आजही हा चित्रपट टीव्हीवर मोठ्या आवडीने पाहिला जातो. या चित्रपटात रीमा लागू, सलमान खान, तब्बू, नीलम कोठारी, सोनाली बेंद्रे, करिश्मा कपूर, सैफ अली खान, मोहनीश बहल, आलोक नाथ, सतीश शाह, असे अनेक कलाकार होते. आता या चित्रपटातील भूमिकेबद्दल अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने खास गोष्ट सांगितलीये.