
लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या अभिनयाने बॉलिवूड प्रेक्षकांवरही छाप पाडलीये. तिने बॉलिवूडमध्येही स्वतःची जागा निर्माण केलीये. नुकताच तिचा 'सुशीला सुजीत' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. आता सोनालीने नुकतीच दिलेली एक मुलाखत सोशल मीडियावर चर्चेत आहे. यात तिने बॉलिवूडमधील वजन कमी करण्याच्या ट्रेंडवर भाष्य केलंय. सोबतच बॉलिवूड कलाकार स्वतःचं वजन कसं कमी करतात याबद्दलही सांगितलंय.