
लोकप्रिय मराठी अभिनेत्री सिनेसृष्टीची अप्सरा असलेली सोनाली कुलकर्णी कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. ती कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत जोडलेली असते. ती तिचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. चाहत्यांच्या कमेंटवर ती रिप्लाय देते तर उगीच ट्रोल करणाऱ्यांना देखील चांगलंच सुनावताना दिसते. अशाच एका ट्रोलरचा सोनालीने समाचार घेतलाय.