
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. तिने मराठसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केलं. उत्कृष्ट कलाकारांमध्ये तिची गणना केली जाते. तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीये. सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. नुकतीच तिने केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. यात तिने तिला आलेला पुणेकरांचा अनुभव सांगितलाय.