
Entertainment News : जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा ‘परम सुंदरी’ हा नवा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी ट्रेलरपासूनच जान्हवी कपूरच्या मल्याळी उच्चारांवर आणि रूढीवादी चित्रणावर जोरदार टीका होताना दिसली आहे. सोशल मीडियावर जान्हवीच्या संवादांच्या उच्चाराची नक्कल करणारा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला.