

himesh reshmiya second wife
esakal
असे अनेक कलाकार आहेत जे फार कमी मालिका किंवा चित्रपटात दिसले आणि नंतर गायब झाले. त्यातलीच एक आहे लोकप्रिय गायक हिमेश रेशमिया याची दुसरी पत्नी सोनिया कपूर. रामानंद सागर यांची लोकप्रिय मालिका ‘श्रीकृष्ण’ आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली होती. याच मालिकेत भगवान श्रीकृष्णाची बहीण सुभद्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री होती सोनिया कपूर हिने. या मालिकेत ती एक कुशल धनुर्धारी म्हणूनही पाहायला मिळाली होती. तिच्या वाट्याला अवघ्या तीन भागांमध्ये भूमिका आली होती. मात्र, कमी वेळ पडद्यावर दिसूनही सोनियाने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र ती हिमेशची दुसरी पत्नी आहे जिच्यासाठी हिमेशने आपला संसार मोडला होता असं म्हटलं जातं.