kankhajura esakal
Premier
खोलवर दडलेली गुपितं आणि अपराधीभाव… 'कानखजुरा'चा ट्रेलर पाहून वाटेल भूतकाळाची भीती
Kankhajura Trailer Release: या कथेत दोन दुरावलेल्या भावांमधील नात्याचा वेध घेण्यात आला आहे.
सोनी लिव्हची कानखजुरा ही वेबसीरिज एका पछाडणाऱ्या गोष्टीची सफर प्रेक्षकांना घडवणार आहे. या गोष्टीत शांतता फसवी आहे आणि नजरेआड लपलेल्या बाबी डोळ्याला दिसणाऱ्या बाबींहून खूपच घातक आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने एका अनोख्या जगाची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. या जगात अपराधीभाव पाठ सोडत नाही, रहस्ये समोर येत राहतात आणि भूतकाळ सूड उगवतो.