
अभिनेता सुरज पांचोली हा त्याच्या 'केसरी वीर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याचा हा पहिलाच सिनेमा आहे. या निमित्ताने त्याने दिलेली मुलाखत सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजतेय. यात तो आपल्या वैयक्तिक आयुष्यासोबतच त्याच्या आईवडिलांच्या नात्याबद्दलही स्पष्टपणे बोलला आहे. सुरज हा अभिनेता आदित्य पांचोली आणि अभिनेत्री झरीना वहाब यांचा मुलगा आहे. मात्र झरीना यांच्याशी विवाह झाला असतानाही आदित्यचे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर जोते. त्याने स्वतः आपलं कंगना रणौतसोबत अफेअर असल्याचं सांगितलं होतं. मात्र असं असूनही त्याची आई झरीना हिने नवऱ्याला घटस्फोट का दिला नाही याबद्दल आता सुरजने भाष्य केलंय.