
'हिरो', 'सॅटलाईट शंकर' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता सुरज पांचोली सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेते आदित्य पंचोली याचा मुलगा सुरज हा पुन्हा एकदा चित्रपटातून कमबॅक करणार आहे. तो त्याच्या 'केसरी वीर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र काही वर्षांपूर्वीत्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री जिया खान आत्महत्येप्रकरणी तो चर्चेत होता. त्यानेच जियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप होता. यामुळे त्या तुरुंगातही जावं लागलं होतं. आता सुरजने नुकताच त्याचा अंडा सेलमधला अनुभव सांगितला आहे.