
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधून एक धक्कादायक माहिती समोर येतेय. दक्षिण भारतीय चित्रपट निर्माते केपी चौधरी यांनी आत्महत्या केली आहे. केपी चौधरी म्हणजेच शंकरा कृष्ण प्रसाद चौधरी हे टॉलीवूडमधील एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. त्यांनी २०१६ मध्ये रजनीकांतचा सुपरहिट चित्रपट 'कबाली' ची निर्मिती केली. २०२३ मध्ये, केपी चौधरी यांना सायबराबाद स्पेशल ऑपरेशन्स टीमने ड्रग्जशी संबंधित प्रकरणात अटक केली होती. आता त्यांनी आत्महत्या करत स्वतःचं जीवन संपवलंय.