

sridevi
esakal
बॉलिवूडच्या लवडी सुपरस्टार म्हणवल्या जाणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी अभिनयाची सुरुवात करणाऱ्या श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाच्या आणि नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांना वेड लावलं. त्या काळात त्यांनी सगळ्यांना मागे टाकलं. त्या पुरुष कलाकारापेक्षाही जास्त मानधन आकारत होत्या. मात्र २०१८ मध्ये त्यांचं दुबईत बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. त्यानंतर प्रेक्षकांना स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. मात्र त्यांच्या निधनानंतरही त्यांची कमाई सुरूच राहिली. आता ते पैसे कोण घेतं?