
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचा प्रगतीचा आलेख हा चढतच गेला. त्यांच्या चित्रपटांइतकंच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही चाहत्यांमध्ये चर्चेत होतं. श्रीदेवी आणि मिथुन यांच्या अफेअरच्या तेव्हा प्रचंड चर्चा होत्या. त्यांनी गुपचूप लग्नही केलं होतं असं म्हटलं जातं. मात्र काही कारणाने त्यांचं नातं तुटलं. त्यामागचं कारण ठाऊक नसलं तरी तेव्हा मिथुन यांच्यापासून दूर होण्याचा श्रीदेवी यांना धक्का बसला होता. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने श्रीदेवी तेव्हा कशा वागत होत्या हे सांगितलं आहे.