

kunjika kalvit
ESAKAL
आई होणं ही स्त्रीसाठी सगळ्यात मोठी देणगी मानली जाते. मात्र हा प्रवास खूप थकवणारा असतो. त्यात शारीरिक थकव्यासोबतच मानसिक थकवाही येतो. पूर्वी बाळ ही फक्त आईची जबाबदारी मानली जायची. पण आता वडील म्हणून पुरुषही आपली जबाबदारी तितक्याच मेहनतीने पार पाडताना दिसतात. अशाच एका पुरुषाचं मराठमोळ्या अभिनेत्रीने कौतुक केलंय. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'शुभविवाह' मालिकेतील लोकप्रिय खलनायिका कुंजिका काळवीट हिने तिच्या नवऱ्यासाठी एक पोस्ट शेअर केलीये. कुंजिका लग्नाच्या दहा वर्षांनी आई झालीये. आणि या प्रवासात तिचा नवरा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचं तिने सांगितलंय.