झी मराठीचा गाजलेला नायक साकारणार स्टार प्रवाहच्या 'आनंदी' मालिकेत मुख्य भूमिका; गाजवलेली आधीची भूमिका

STAR PRAVAH NEW SERIAL LEAD ROLE ACTOR: स्टार प्रवाहवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत झी मराठीचा गाजलेला नायक मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
STAR PRAVAH NEW SERIAL LEAD ACTOR

STAR PRAVAH NEW SERIAL LEAD ACTOR

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावर काही दिवसात आणखी काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यात स्टार प्रवाह, कलर्स मराठी आणि झी मराठी अशा तीनही वाहिन्यांचा समावेश आहे. या तीनही वाहिन्यांवर नव्या मालिका सुरू होणार आहेत. त्यात स्टार प्रवाहवर 'आनंदी'; नावाची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत एका अंध मुलीची म्हणजेच आनंदीची कथा दाखवण्यात येणार आहे. एका अपघातात तिची दृष्टी जाते मात्र ती तिचा आत्मविश्वास ढळू देत नाही. ती जीवन जगण्याचा दृष्टिकोन आनंदीच ठेवते. ही मालिका स्टार प्रवाहवर १६ मार्च पासून सुरू होणार आहे. आता या मालिकेत आनंदीसोबत कोण दिसणार याची माहिती समोर आलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com