

STAR PRAVAH NEW SERIAL
ESAKAL
छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. तर काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यात सध्या स्टार प्रवाह आणि झी मराठीवर टीआरपीची स्पर्धा सुरू आहे. झी मराठी स्टार प्रवाहच्या मालिकांवर भारी पडताना दिसतंय. त्यामुळेच स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट आणले जातायत. अशातच आता स्टार प्रवाहने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केलीये. एक नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्या मालिकेचा प्रोमो समोर आलाय.