
छोट्या पडद्यावरील कार्यक्रम हे घराघरात आवडीने पाहिले जातात. मालिका या प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीच्या. मात्र त्यांच्यासोबतच काही करमणुकीचे कार्यक्रम देखील प्रेक्षकांच्या भेटीला आणले जातात. आता असाच एक कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. स्टार प्रवाह वाहिनीवर आणखी एका कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलीये. स्टार प्रवाहवर लवकरच एक कथाबाह्य कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'शिट्टी वाजली रे' असं या कार्यक्रमाचं नाव असून यात अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळतायत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय.