
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या. मात्र मालिकांचं संपूर्ण गणित हे त्यांच्या टीआरपीवर आधारित असतं. टीआरपी चांगला असला की ती मालिका वर्षानुवर्ष सुरू राहते. मात्र टीआरपी कमी झाला की मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते. टीआरपी वाढवण्यासाठी मालिकेच्या निर्मात्यांकडून प्रयत्नही केले जातात. असेच प्रयत्न आता स्टार प्रवाहकडूनही करण्यात येतायत. 'ठरलं तर मग' आणि 'घरोघरी मातीच्या चुली' चा टीआरपी वाढवण्यासाठी स्टार प्रवाहनेच कंबर कसली आहे.