

STAR PRAVAH SERIAL TIME CHANGE
ESAKAL
छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसात अनेक बदल झालेत. महिन्याभरापूर्वी काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात स्टार प्रवाहावरील 'नाईक बाई' ही मालिकादेखील होती. तर स्टार प्रवाहने तब्बल ८ नव्या मालिकांची घोषणा केलीये. त्यातल्या तीन मालिकांची नावं जाहीर करून प्रोमोही शेअर केलेत. त्या मालिका म्हणजे 'मी कात टाकली', 'तुझ्याकडे तुला मागणे' आणि 'मराठी मिडीयम'. या तीनही मालिकांचे प्रोमो समोर आलेत. त्यातील 'मी कात टाकली' ही मालिका ' २८ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या मालिकेची वेळ समोर आलीये. त्यासाठी स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेची वेळ बदललीये. कोणती आहे ती मालिका?