
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने 'होणार सून मी या घरची' मधून प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यानंतर ती प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली. तिने झी मराठीवरच 'अग्गबाई सासूबाई' ही मालिका केली. त्यानंतर मात्र ती स्टार प्रवाहच्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत दिसली. मात्र तिने अचानक ही मालिका सोडली आणि ती आता पुन्हा एकदा झी मराठीच्या 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच आता तेजश्रीच्या नव्या इनिंगवर स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांची प्रतिक्रिया आली आहे.