स्टार प्रवाहची नवी मालिका 'बाई तुझा आशीर्वाद'चा प्रोमो समोर; ईशा केसकर नाही 'ही' अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका

STAR PRAVAH NEW SERIAL BAI TUZA ASHIRVAD RELEASE DATE AND TIMING: छोट्या पडद्यावर आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. नुकताच स्टार प्रवाहवरील नवीन मालिका 'बाई तुझा आशीर्वाद' चा प्रोमो समोर आलाय.
STAR PRAVAH NEW SERIAL bai tuza ashirvad

STAR PRAVAH NEW SERIAL bai tuza ashirvad

esakal

Updated on

BAI TUZA ASHIRVAD RELEASE DATE AND TIMING: छोट्या पडद्यावर गेल्या काही काळात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकांमधील अनेक मालिकांनी टीआरपी यादीत स्थान मिळवलंय. आता त्यात आणखी एक मालिका आपलं स्थान पक्क करायला येतेय. स्टार प्रवाहने महिन्याभरापूर्वी दोन मालिकांची घोषणा केली होती. त्यात पहिली होती 'आनंदी'. ही मालिका ३० मार्चपासून रात्री ८ वाजता प्रदर्शित होणार आहेत. त्यापाठोपाठ आता आणखी एका मालिकेचा प्रोमो समोर आलाय. ही मालिका म्हणजे 'बाई तुझा आशीर्वाद'. या मालिकेचा एआय प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता, आता अखेर या मालिकेचे कलाकार आणि वेळ समोर आलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com