
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या समोर आल्या. त्यात झी मराठी आणि स्टार प्रवाह या वाहिन्यांवर सगळ्यात जास्त नव्या मालिका आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाहवर एका नवीन मालिकेची सुरुवात झालीये. 'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेला सुरू होऊन २ दिवस झाले असतानाच आता स्टार प्रवाहने आणखी एका मालिकेची घोषणा केली. त्यात नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय. मात्र या मालिकेतील ट्विस्टने प्रेक्षकही चकीत झालेत,.