

star pravah new serial promo
ESAKAL
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात सगळ्यात जास्त मालिका या स्टार प्रवाहवर सुरू झाल्या. २ महिन्यांपूर्वीच स्टार प्रवाहने ८ नव्या मालिकांची घोषणा केलेली. तर काही दिवसांपूर्वीच वाहिनीने त्यांच्या नव्या मालिकेची घोषणा केली. ही मालिका म्हणजे 'तुझ्याकडे तुला मागणे'. यात अभिनेता राकेश बापट मुख्य भूमिकेत आहे. तर या मालिकेच्या पाठोपाठ आता आणखी एका मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. या मालिकेचं नाव आहे 'मराठी मिडीयम'. या मालिकेचा दुसरा प्रोमो आता प्रदर्शित करण्यात आलाय. यात मालिकेतील कलाकारदेखील दिसत आहेत.