

tuzya sobatine
esakal
छोट्या पडद्यावर गेल्या काही काळात अनेक नवीन मराठी मालिका सुरू करण्यात आल्या. त्यातलं काही मालिका चांगल्या सुरू आहेत. तर काहींना कमी टीआरपीवर समाधान मानव लागलंय. अशातच स्टार प्रवाहने नव्या मालिकांची घोषणा केली होती. त्यात 'तुझ्या सोबतीने' ही मालिकादेखील आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा प्रोमो समोर आला होता. आता या मालिकेची तारीख आणि वेळ समोर आलीये. स्टार प्रवाह वाहिनीने एक पोस्ट करत या मालिकेची तारीख आई वेळ जाहीर केलीये. मात्र यासाठी एका काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या मालिकेची वेळ बदलणार आहे.